Ad will apear here
Next
कल हो ना हो....

काही गाणी तुम्हाला काही केल्या विसरता येत नाहीत. त्या गाण्याशी निगडित तुमच्या आठवणी नेहमी ताज्या रहातात. ते गाण जेंव्हा जेंव्हा तुम्ही ऐकता तेंव्हा तेंव्हा तुमचे मन भूतकालात जाते आणि त्या आठवणी जाग्या होतात पुन्हा.. पुन्हा.. परत... परत... माझी नोकरीसाठी परदेशवारी नक्की झाली तेंव्हा घरच्यांना आनंद झाला. आईलाही आनंद झाला; पण तिची बिचारीची अवस्था एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू अशी होती. माझी परदेशवारीसाठी खरेदी चालू होती. त्यात एका दिवशी संध्याकाळी आम्ही जाऊन एक फिलिप्स कम्पनीचा वॉकमन आणला, बरोबर दोन तीन कॅसेटसही आणल्या. बाकीच्या दोन्ही आठवत नाहीत, पण एक होती तेंव्हाच्या नवीन येऊ घातलेल्या चित्रपटाची ‘कल हो ना हो’ची. गाणी विशेषत: टायटल ट्रॅक श्रवणीय होते. मी वॉकमन व्यवस्थित काम करतो आहे की नाही ते तपासायला म्हणून ती कॅसेट लावली. वॉकमन व्यवस्थित काम करीत होता. गाणं सुरू झालं आणि माझ्या मनातले विचारसुद्धा..


हर घड़ी बदल रही है रूप ज़िंदगी
छाँव है कभी, कभी है धूप ज़िंदगी
हर पल यहाँ जी भर जियो
जो है समाँ कल हो न हो...

मी एकटाच बाहेर गावी जाणार आहे. आई-बाबांशिवाय रहाणार आहे. जमेल का मला? मी राहीलो तरी आई बाबा राहू शकतील का माझ्या शिवाय. आईला मार्केटमध्ये कोण घेऊन जाईल. तिला फळं कोण आणून देईल?

 चाहे जो तुम्हें पूरे दिल से
मिलता है वो मुश्किल से
ऐसा जो कोई कहीं है
बस वो ही सबसे हसीं है
उस हाथ को तुम थाम लो
वो मेहरबाँ कल हो न हो
हर पल यहाँ... 

आई आता माझ्यासाठी गाजराच्या वड्या बनवते आहे. त्या मला बरोबर घेऊन जायच्या आहेत. आईने मला हॉकिन्सचा छोटासा प्रेशर कुकर आणून दिला आहे. मला मुगाची खिचड़ी आणि उसळी बनवायला शिकवले आहे. जमतील का ते पदार्थ मला? आईसारखे होणार नाहीत हे नक्की, पण थोडे तरी सारखे होतील का ते ?

पलकों के ले के साये
पास कोई जो आये
लाख सम्भालो पागल दिल को
दिल धड़के ही जाये
पर सोच लो इस पल है जो
वो दास्ताँ कल हो न हो
हर घड़ी बदल रही है...


आईने गाजराच्या वड्या आता देवासमोर ठेवल्या आहेत. आणि ती देवाला नमस्कार करते आहे. मला खात्री आहे माझ्या खुशालीशिवाय तिने देवाजवळ दुसरं काही मागितलं नसणार. मी आता हेडफोनची एक बाजू तिच्या कानाला लावली आहे आणि दुसरी बाजू माझ्या कानाला आहे. आम्ही दोघं मिळून आता गाणं ऐकत आहोत. मध्येच आमच्या डोक्याची टक्कर झाली आहे आणि आम्ही दोघेही हसत आहोत. इतके हसतोय.. इतके हसतोय की डोळ्यातून पाणी भरून राहिलं आहे, त्याची कल्पनाच नाहीये आम्हा दोघांना.  

- केदार साखरदांडे, मुंबई

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZRTCG
Similar Posts
आभाळाची छत्री... माझ्याकडे एक छत्री आहे. माझी आभाळाची छत्री.. गुलाबी रंगाची, लांब दांड्याची....या छत्रीला मी जसा विसंबत नाही, तशी छत्रीसुद्धा मला कधी विसंबत नाही...
फोडणी महात्म्य... रोजच्या जेवणातील भाजी, आमटी, कोशिंबीर असे अनेक पदार्थ फोडणीशिवाय बनवले तर, विचारच करवत नाही ना..बरं ही फोडणी तरी एकाच प्रकारची असते का, नाही तिचेही किती नखरे... असे हे लज्जतदार फोडणी महात्म्य...
मै कौन हूँ? ‘मै कौन हूँ?’ म्हणजेच मी कोण आहे? हा प्रश्न अनेकदा आपण चित्रपटात स्मृतिभ्रंश झालेल्या नायकाला अथवा नायिकेला पडलेला असल्याचे पाहतो. हा प्रश्न मलाही नेहमी पडतो (माझा स्मृतिभ्रंश झालेला नाही, याची नोंद घ्यावी कृपया) आणि मग मी थोडासा गोंधळतो. मला हा प्रश्न का पडावा या विचाराने मी हैराण होतो आणि मग मी स्वत:ला शोधायला सुरुवात करतो
कधी तरी स्वत:साठी जगावं..... सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात माणूस इतका यांत्रिक झालाय की आजूबाजूचा निसर्ग, त्याचे सौंदर्य बघणंच विसरून गेलाय. स्वतःसाठी थोडा वेळ काढावा, आपल्या आवडीनिवडी जपाव्यात हेदेखील तो विसरून चाललाय. त्यामुळे प्रत्येकाचा जणू यंत्रमानव झालाय. यातून बाहेर पडून स्वतःसाठी जगायची गरज आहे...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language